तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुंड पिंपरी-चिंचवड शहरात शस्त्रासह आढळून आला. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी चिंचवड येथे कारवाई करत त्या गुंडाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 1) दुपारी करण्यात आली.

निहाल महमद शेख (वय 25, रा. मोहननगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शिवाजी मुंडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी निहाल शेख याला 17 नोव्हेंबर 2023 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article