रखवालदार मदतनीस पदांच्या नोकरीसाठी बनवली खोटी कागदपत्रे, पाच जणांवर गुन्हा दाखल

1 Min Read

थेरगाव, दि. १३ (पीसीबी) – कंत्राटी पद्धतीने रखवालदार आणि मदतनीस या पदांच्या नोकरीसाठी पाच जणांनी बनावट कागदपत्रे तयार केली. हे प्रकरण गुरुवारी (दि. 12) न्यू थेरगाव हॉस्पिटल येथे उघडकीस आले आहे. हा प्रकार मार्च 2023 पासून सुरु होता.

दीपक सीताराम वाघ (वय 42, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन महिला, अनिल सुदाम शेळके (वय 45, रा. चिंचवड), काळूराम केशव ओव्हाळ (वय 43, रा. थेरगाव गावठाण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नॅशनल सिक्युरिटी सर्विस या कंपनीत नोकरी करतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या न्यू थेरगाव हॉस्पिटल मध्ये नॅशनल सिक्युरिटी सर्विस या कंपनीतर्फे कंत्राटी पद्धतीने रखवालदार, मदतनीस या पदांसाठी भरती करण्यात आली. त्यात आरोपींनी नववी पास असल्या बाबतचे बनावट खोटे शाळा सोडल्याचे दाखवले बनवून ते फिर्यादी यांच्याकडे जमा केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article