ओटास्कीम येथे तरुणाचा खून; एक जण गंभीर जखमी

1 Min Read

निगडी,दि.१२(पीसीबी) – निगडी परिसरातील ओटास्कीम येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोघांवर हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री घडली. आकाश दूनधव (वय 22, रा. ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा साथीदार गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ओटास्कीम येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर खुनी हल्ला केला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी पळून गेले. आरोपींच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

मयत आकाश आणि आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Share This Article