भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याची गोळ्या झाडून हत्या; पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड

1 Min Read

विदेश,दि.११(पीसीबी) – भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तो पाकिस्तानात लपून बसला होता. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शाहिद लतीफ हा पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. तो पाकिस्तानातील सियालकोटमध्ये लपून बसला होता.

लतीफ एनआयएने युपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. २०१६ मध्ये जैश या दहशतवादी संघटनेकडून पठाणकोट एअरबेसवर हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये सात जवान शहीद झाले होते. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार सियालकोच्या बाहेर एका मशिदीत दहशतवागी शाहिद याची हत्या करण्यात आली. हल्लेखोर मोटरसायकलवर आले होते आणि त्यांनी शाहिदवर गोळ्या झाडल्या त्यानंतर ते फरार झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून हल्लेखोरांचा शोध घेणे सुरू आहे.

Share This Article