अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

bpcauthor bpcauthor
1 Min Read

निघोजे, दि. ४ (पीसीबी) – दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 2) सकाळी पावणे नऊ वाजता डोंगर वस्ती, निघोजे येथे घडली.

कल्पना भूपाल गडेकर (वय 34, रा. खराबवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विष्णू बळीराम लोखंडे (वय 36, रा. निगडी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मैत्रीण कल्पना गडेकर या त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14/जेजी 9533) बाणेर येथून खराबवाडी येथे जात होत्या. निघोजे मधील डोंगरवस्ती येथे त्या आल्या असता त्यांच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने कल्पना यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article