ट्रॅक्टरला धडक दिली म्हणून कार चालकाला बेदम मारहाण

1 Min Read

चिखली, दि. १०(पीसीबी) – ट्रॅक्टर व कारची समोरा-समोर धडक बसली याच रागातून ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या चार जणांनी कार चालकाला कंबरेच्या बेल्टने मारहाण केली आहे. हा अपघात शनिवारी (दि.7) सोनावस्ती चिखली येथे घडला.

याप्रकरणी साईदअन्वर अब्दुल शेख (वय 27 रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून रोहित भानुदास यादव व भानुदास यादव (रा.चिखली) व त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या आईला घेण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरशी कारचा अपघात झाला. याचा राग मनात धरून ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.तसेच लाथाबुक्क्यांनी कंबरेच्या बेल्टने मारून फिर्यादी यांना जखमी केले.यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article