शिंदे गटाचे आमदाार संपर्कात, पुन्हा सत्तांतर होणार असल्याचा दावा

PCB Admin
1 Min Read

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : शिंदे गटातील काही आमदार अस्वस्थ आहेत, त्यांना फसवले गेले. तेच आमदार आता आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे सत्तापरिवर्तन अटळ असेल.’ असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले, “सर्वोच्च न्यायालय कायद्यानुसार निर्णय देणार याची खात्री त्यामुळे सोळा आमदार अपात्र होतील. शिंदे गटाला पक्षात विलीन व्हावे लागेल. आमदार आमच्या संपर्कात असून भविष्यात पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन झाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.”

अर्जुन खोतकर यांच्याबद्दल राऊत म्हणाले, “सोनिया गांधी, राहुल गांधी, संजय राऊतांवर कारवाई ईडी करीत आहे हे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर टाच आणण्याचा प्रयत्न आहे. अर्जुन खोतकर यांचे अभिनंदन करतो की, त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले की, त्यांच्यावर आणि कुटुंबावर ईडीचा तणाव आहे हे ठोस कारण त्यांनी सांगितले. त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली नाही. त्यांना बदनाम केले नाही आणि फुटीरांसारखे आरोप केले नाही ते खरे बोलले त्यांच्या प्रामाणिकपणाला दाद देतो.”

ते म्हणाले “महाराष्ट्राच्या मनात खूप गोंधळ आहे शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री स्वतःला म्हणत असतील तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जाण्याची गरज नसते. अमित शहासुद्धा मातोश्रीवर येत होते ते एक तेव्हाचे नाते होते. पण पाचवेळा मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जावे लागते ते त्यांचे बस्तान मुंबईत हलवतात की काय अशी स्थिती आहे.”

Share This Article