पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

PCB Admin
1 Min Read

चिखली, दि. ८ (पीसीबी) – रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 7) दुपारी तीनच्या सुमारास आर्केड सोसायटी, चिखली येथे घडली.

याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी दुपारी चिखली येथील आर्केड सोसायटीसमोरून पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून दोन चोरटे आले. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 94 हजार 500 रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article