वीज बिल माफ करा

0
1067

पिंपरी, दि. १४ (पीसीबी ) – कोरोनामुळे दोन महिने सर्व उद्योग, व्यापर ठप्प असल्याने किमान या काळातील वीज बिल माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यापारी सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्या संदर्भातील निवेदन त्यांनी आज पाठविले.
आपल्या निवोदनात ते म्हणतात, पिंपरी चिंचवड औद्योगिक शहर आहे. १०० टक्के नागरिक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उद्योगांवरच अवलंबून आहेत. कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. कोरोना सारख्या महामारीमुळे संपूर्ण देशात लाँकडाऊनची स्थिती आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर रेडझोन मध्ये असल्याने याठिकाणी सर्व एमआयडीसी, उद्योग ,व्यापार गेली दोन महिने बंद आहेत. यामुळे उद्योजकासह कामगार वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी किती अवधी लागेल हे सांगता येत नाही. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी किमान लाँकडाऊनच्या काळातील म्हणजे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यातील महिन्यातील वीज मीटर रिडींग घेण्यात आलेले नाही. यामुळे सर्व ग्राहकांना अंदाजे विजबिल आकारण्यात आले आहे, ते वीजबिल सरसकट माफ करावे. त्यात घरगुती, व्यवसायिक स्वरूपात असलेल्या वीजबिलाचा समावेश करण्यात यावा. जुन महिन्यापासूनचे लाईट मीटर रिडींग घेवून विजबिल आकारणी करण्यात यावी व पिंपरी चिंचवड शहरवासीयांना आर्थिक संकटात मदत करावी, अशी प्रदिप गायकवाड यांनी केली आहे