२१ लाख रुपयांचे बनावट मास्क जप्त

0
150

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – गुन्हे शाखेने २१ लाख रुपयांच्या बनावट मुखपट्टय़ा हस्तगत के ल्या. या प्रकरणी सफदर हुसैन महोम्मद जाफर मोमीन (४२) यास अटक करण्यात आली. आरोपी एन-९५, व्ही ४१० व्ही मुखपट्टय़ा तयार करून त्या व्हेनस कं पनीच्या आहेत, असे भासवून बाजारात विकणार होता. हस्तगत मुखपट्टय़ा दर्जाहीन असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत यांना याबाबत आगाऊ माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक नितीन पाटील, सहायक निरीक्षक गजानन भारती आणि पथकाने लोअर परळच्या पोद्दार मिल परिसरात सापळा रचून आरोपीचे मालवाहू वाहन अडवून सुमारे १७ हजार बनावट मुखपट्टय़ा हस्तगत केल्या.

पुणे, मुंबई सह राज्याच्या अन्य शहरांतही अशाच प्रकारचे बनावट मास्क विक्री सर्रास सुरू आहे. महामार्ग, रस्त्याच्या दुतर्फा अथवा बाजारपेठेतही अशा पध्दतीचे निकृष्ठ मास्क विक्रीला आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून त्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.