२१ फेब्रुवारीपासून राम मंदिर उभारणीला सुरुवात; धर्म संसदेची घोषणा

0
604

प्रयागराज, दि. ३० (पीसीबी) – पुढील महिन्यात साधू-संत आणि महंत प्रयागराजहून अयोध्येकडे रवाना होणार आहेत. २१ फेब्रुवारीपासून राम मंदिर उभारणीला सुरुवात होईल, अशी घोषणा धर्म संसदेने  प्रयागराज येथे साधू, संतांची सुरू असलेल्या  धर्म संसदेत आज (बुधवार)  केली.  

वसंत पंचमीपासून आम्ही सर्वजण अयोध्येकडे मार्गक्रमण करणार आहोत. यादरम्यान, आमच्यावर गोळीबार जरी झाला, तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा धर्म संसदेचे नेतृत्व करणारे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी यावेळी दिला.

लोकशाहीच्या तीन स्तभांपैकी कोणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर आंदोलकांनी अटक करवून घ्यावी, असा धर्मादेश आम्ही जारी करत आहोत. राम मंदिराची उभारणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे स्वरुपानंद सरस्वती यांनी सांगितले.