होळकरवाडी ग्रामपंचातीच्या उपसरपंचपदी दत्तात्रय सुरेश होळकर यांची बिनविरोध निवड

0
663

पुणे, दि.३० (पीसीबी) – हवेली तालुक्यातील होळकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रज्ञा झांबरे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली . होळकरवाडी ग्रामपंचातीच्या उपसरपंचपदी दत्तात्रय सुरेश होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

यावेळी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच दत्तात्रय होळकर म्हणाले कि , गावच्या विकासात कोणतेही राजकारण किंवा गट – तट न पाळता सर्वांना बरोबर घेऊन गावातील रस्ते , पाणी , ड्रेनेज , आरोग्य या मूलभूत समस्या मार्गी लावण्याबरोबरच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचे विविध उपक्रम व प्रकल्प राबवून गावाचा कायापालट करू अशी ग्वाही होळकर यांनी दिली .

यावेळी ग्रामपंचायत सदस्यां राहुल खोटे , शीतल हिंगे , ग्रामसेवक विराज पवार , माजी सरपंच गोविंद झांबरे ,बाबुराव कामठे , दत्तानाना हिंगे , संजय झांबरे बाळासाहेब थिटे , दीपक झांबरे , भरत खोटे , विश्वास झांबरे , झहीर सय्यद , दादा काळभोर , दादासाहेब पठारे , उद्योगपती राजेंद्र  भिंताडे , प्रविण होळकर , माउली हिंगे , अमित होळकर , सोमनाथ होळकर , अतुल होळकर , सुजीत होळकर , संतोष हिंगे , आशिष होळकर , गणेश हिंगे व हेमंत काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते .दत्तात्रय होळकर यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या निनादात आनंदोत्सव साजरा केला .