शिवसेनेने केवळ एका खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या अगदी विरोधात भूमिका घेतली – प्रकाश जावडेकर

0
351

मुंबई,दि.२९(पीसीबी) – देशभरातील अनेक राजकीय पक्षांनी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) विरोध केला असून यामध्ये शिवसेनेचाही समावेश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिवसेनेने घेतलेल्या भुमिकेवर टीका केली असून शिवसेनेने केवळ एका खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या अगदी विरोधात भूमिका घेतली असून ते अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेने केवळ एका खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या अगदी विरोधात भूमिका घेतली आहे. निर्वासितांना शरण देऊ आणि घुसखोरांना हाकलून देऊ, असे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. पण शिवसेना आता बदलली असल्यामुळे ते आता बाळासाहेबांना हिंदूह्रदयसम्राटही म्हणत नाहीत. बांगलादेशवासी तसेच घुसखोरांबद्दल बाळासाहेब काय बोलले होते हे शिवसेना विसरुन गेल्याचे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.