हॉस्पिटलमध्ये येऊन रुग्णांसमोर डॉक्टर महिलेसोबत गैरवर्तन; तरुणावर गुन्हा दाखल

0
403

चाकण, दि. २० (पीसीबी) – हॉस्पिटलमध्ये येऊन तरुणाने महिला डॉक्टर सोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. त्यांनतर महिला डॉक्टरचा पाठलाग केला. ही घटना 14 जानेवारी रोजी दुपारी पाच ते रात्री आठ या कालावधीत आंबेठाण चौक, चाकण येथे घडली.

राकेश राजेश तेलगू (वय 26, रा. देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिला डॉक्टरने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आंबेठाण चौकातील एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. 14 जानेवारी रोजी त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना तपासात असताना आरोपी हॉस्पिटलमध्ये आला. त्याने डॉक्टरसोबत रुग्णांसमोर गैरवर्तन केले. डॉक्टर महिलेने आरोपीला विरोध केला असता त्याने डॉक्टरला धक्काबुक्की करून धमकी दिली. तसेच डॉक्टरचा पाठलाग केला. महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम जाधव तपास करीत आहेत.