हॉटेलच्या रूम मधून एक लाखाचे सोन्याचे ब्रेसलेट चोरीला

0
459

हिंजवडी, दि. ६ (पीसीबी) – हॉटेल मध्ये थांबलेल्या एका तरुणाच्या खोलीतून अज्ञात चोरट्याने एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 3) रात्री साडेदहा ते शनिवारी (दि. 4) दुपारी दोन वाजताच्या कालावधीत साखरेवस्ती, हिंजवडी येथील फॅकशिफ हॉटेल मध्ये घडली.

अक्षय प्रमोद बाफना (वय 22, रा. कसबापेठ, पुणे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी साखरेवस्ती येथील फॅकशिफ हॉटेल मध्ये थांबले होते. शुक्रवारी रात्री साडेदहा ते शनिवारी दुपारी दोन वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या रूममध्ये प्रवेश करून सॅक मध्ये ठेवलेले एक लाख रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.