हे आहेत जगातील ‘मृत्यू शिखरं’ पर्वत; ज्याची चढाई जीवघेणी ठरू शकते…

0
673

हे जग खूप आश्चर्यकारक आणि रहस्यमयतेने भरलेले आहे. शिवाय जगाला नैसर्गिक सौंदर्याने आणखीनच बहर आलाय. या सौंदर्याने हे जग अगदी परिपूर्ण झालं आहे. आणि हे सौंदर्यच आपल्याला आकर्षित करते. आपल्या या जगात अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या एकमेव स्वरूपात आहेत. चला तर आपण आज जगातील सर्वात उंच पर्वत कोणते आहेत ते पाहुयात…

१. मकालू (Makalu):‘मकालू’ हे चीनमधील नेपाळच्या सीमेवर एव्हरेस्टच्या दक्षिण-पूर्व दिशेस १९ कि.मी. अंतरावर आहे. ज्याची उंची ८४५८ मीटर (२७८३८ फूट) आहे. हा पर्वत मुख्यतः आपल्या आयकॉनिक पिरामिड आकारासाठी ओळखला जातो. १९५५ मध्ये लिओनेल टेरे आणि जीन कॉसी यांनी सर्वात पहिल्यांदा मकालू सर केला होता. मकालू हा साधासुधा डोंगर नसून यावर चढणे खूपच जिकरीचे काम आहे.

२. कंचनजंगा (Kangchanjunga):‘कंचनजंगा’ हा पर्वत भारत आणि नेपाळच्या सीमेवर असून याची उंची तब्बल ८५८६ मीटर (२८१६९ फूट) आहे. एव्हरेस्ट कंचनजंगापासून १२५ किलोमीटर अंतरावर आहे. १८५२ पर्यंत तो जगातील सर्वात उंच पर्वत मानला जात होता, परंतु नंतर मोजणीनंतर एव्हरेस्टला जगातील सर्वात उंच पर्वत म्हणून घोषित केले गेले. १९५५ मध्ये, जो ब्राउन आणि जॉर्ज ब्रँड यांनी सर्वात पहिल्यांदा कंचनजंगा सर केला आहे. 

३. धौलागिरी (Dhaulagiri):जगातील 7 वा सर्वात उंच पर्वत म्हणून ‘धौलागिरी’ ओळखला जातो. नेपाळमध्ये असलेल्या या पर्वताची उंची तब्बल ८१६७ मीटर (२६७९५ फूट) आहे. कांचनजंगा अस्तित्वात येण्यापूर्वी धौलागिरी पर्वत हा जगातील सर्वात उंच पर्वत होता.

४. ल्होत्से (Lhotse):‘ल्होत्से’ हा नेपाळ आणि तिबेटमधील खुंबू नावाच्या क्षेत्रात मोडतो आणि येथून जवळच माउंट एव्हरेस्ट आहे. त्याची उंची ८५१६ मीटर (२७९४० फूट) आहे. अर्न्स्ट रईज आणि फ्रिट्ज लॅचिंगर यांनी १९५६ मध्ये सर्वात पहिल्यांदा यावर चढाई केली होती.

५. माउंट एवेरेस्ट (Mount Everest):माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे, जो नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर वसलेला आहे. हे समुद्रसपाटीपासून 8,848 मीटर (29,029 फूट) उंच आहे. 1953 मध्ये सर एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी एव्हरेस्टवर प्रथम चढाई केली होती.

६. चो ओयू (Cho Oyu):‘चो ओयू’ ची उंची ८१८८ मीटर (२६८६४ फूट) आहे. तर असं म्हणतात कि, इतर पर्वतांपेक्षा या डोंगराचा रस्ता व चढ अधिक सोप्पं आहे. इतर पर्वतांच्या तुलनेत याची चढाई करणे जास्त सोप्पे आहे. हा पर्वत चीन आणि नेपाळच्या सीमेवर असून १९५४ मध्ये नेपाळच्या पसंग दामा लामा, जोसफ जोचलर व हर्बर्ट तिचेरी यांनी सर्वात पहिल्यादा हा पर्वत सर केला होता.

७. अन्नपूर्णा (Annapurna):अन्नपूर्णा हा नेपाळच्या उत्तर केंद्रबिंदूमध्ये असून तब्बल ८००० मीटर (२६५४५ फूट) उंचीवर आहे. अन्नपूर्णाची चढाई धोकादायक मानली जाते. हा हिमालय पर्वतरांगांमध्ये येणारा पर्वत आहे. गिर्यारोहकांसाठी हा पर्वत धोकादायक असून १९९० पासून या डोंगरावर मृत्यूचे प्रमाण जास्त वाढले आहे.

८. नंगा पर्वत (NangaParbat):नंगा पर्वत हा जगातील नववा सर्वोच्च पर्वत आहे. ज्याची उंची ८१२६ मीटर (२६६६० फुट) उंचीवर आहे. हा पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टिस्तान भागात आहे. या पर्वताची चढाई वाटते तितकी सोप्पी नाहीये कारण हाच पर्वत चढाईसाठी सर्वात धोकादायक आहे, म्हणूनच याला ‘किलर माउंटन’ म्हणून देखील ओळखले जाते.

९. K2:हा डोंगर माउंट गॉडविन-ऑस्टेन आणि छोगोरी म्हणूनही ओळखला जातो. तो समुद्रसपाटीपासून ८६११ मीटर (२८२५१फूट) उंच असून तो चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर आहे. आतापर्यंत हिवाळ्यात कोणालाही या डोंगरावर चढता आले नाही कारण हे अशक्य आहे. या पर्वताचा बहुतांश भाग हा पाकिस्तानच्या दिशेने आहे.