हुंदाईची बहुप्रतिक्षित व्हेन्यू अखेर बाजारात दाखल

0
432

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – हुंदाईची बहुप्रतिक्षित व्हेन्यू अखेर बाजारात दाखल करण्यात आली आहे. या कॉम्पॅक्ट एसयुव्हीमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हुंदाईच्या व्हेन्यूबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. व्हेन्यू पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायात उपलब्ध करण्यात आली आहे. व्हेन्यू विविध व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असून, याची एक्स शोरूम किंमत ६.५० लाखांपासून सुरू होत आहे. यात अनेक फिचर्स असून, तरूणाईला डोळ्यासमोर ठेवून अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

हुंदाई व्हेन्यू कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या ब्ल्यू लिंक प्रणालीवर आधारित आहे. यामध्ये लोकेशन बेस्ड सेवांसह रिअल टाईम ट्रॅकिंग, भौगोलिक माहिती, अलर्ट्स आदींची सुविधा मिळणार आहे. स्मार्टफोन अॅपच्या मदतीने यातील विविध फंक्शन्सचा वापर करता येणार आहे. कार लोकेशन शेअरिंग, वायरलेस चार्जर आदींसह अन्य सुविधा मिळतील.

हुंदाईच्या व्हेन्यू या मॉडेलमध्ये १.४ लीटर क्षमतेचे टी-जीडीआय पेट्रोल इंजिन दिले असून, यात ६ स्पीड मॅन्युअल गिअर्स असतील. तर १.४ लीटर क्षमतेची सीआरडीआय डिझेल इंजिनाचा पर्याय दिलेला आहे. याच्या सर्व व्हेरियंटमध्ये मॅन्युअल गिअर्सची सुविधा आहे.