हिंदू राष्ट्र हवं असेल तर पहिलं संविधान बदला – चंद्रकुमार बोस

0
389

कोलकाता,दि.२४(पीसीबी) – कोलकत्यात भाजपने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला पाठिंबा देण्यासाठी विशाल रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीनंतर चंद्रकुमार बोस यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू आणि भाजपचे पश्चिम बंगालचे उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात मुस्लिमांचा समावेश का करण्यात आला नाही? असा सवाल बोस यांनी केला आहे.

नागरिकत्व कायद्यात केवळ काही धर्मियांचा समावेश करण्यासाठी भारत हे काही हिंदू राष्ट्र नाही. तुम्हाला जर भारताला हिंदू राष्ट्रच बनवायचं असेल तर पहिलं संविधानच बदला, अशा शब्दांत चंद्रकुमार बोस यांनी भाजपला सुनावलं आहे.

सीएए कायदा कुठल्याच धर्माशी संबंधित नसल्याचं सांगितलं जात आहे, मग हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि जैनांवर आम्ही का जोर देत आहोत. त्यात मुस्लिमांचा समावेश का केला जात नाही? आम्ही पारदर्शी व्हायला हवं, असं चंद्रकुमार बोस यांनी म्हटलं आहे.