हिंदुत्त्व विकून शिवसेनेने मुख्यमंत्रिपद घेतलं – नारायण राणे

0
419

महाराष्ट्र,दि.८(पीसीबी) – हिंदुत्त्व विकून शिवसेनेनं मुख्यमंत्रिपद घेतलं. ठाकरे सरकार विकास करण्यासाठी अस्तित्वात आलं नसून काम बंद करण्यासाठी आलं आहे. काम बंद करुन ठेकेदाराला बोलवायचं आणि पैसे उकळायचे असंच सर्व सुरु असल्याची, घणाघाती टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे.

सध्या ३ पक्षांचे मिळून सरकार आलं आहे. त्यांना मी स्थगिती सरकार नावं ठेवलं आहे. या सरकारने मागील १० दिवसात केवळ मेट्रो आणि त्यासारख्या अन्य विकास कामांना स्थगिती देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे सध्या विकास कामं बंद पडली आहेत, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

सध्या शिवसेनेचा एक खासदार कोकणात बैठका घेत आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यात शिवसेना नाही. असं असतानाही शिवसेनेचा खासदार सिंधुदुर्गमध्ये शासकीय बैठका कसा घेतो? अधिकाऱ्यांना सूचना कशा करतो?, हे जनतेसाठी, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी नाही, तर फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत, असंही नारायण राणे यांनी सांगितलं आहे.