हिंजवडीत वृध्द जागा मालकाला तृतीयपंथी आणि टोळक्यांनी नामचिन गुंडाचे नाव घेऊन धमकावले

0
852

हिंजवडी, दि. २८ (पीसीबी) – एका वृध्द जागा मालकाला तृतीयपंथी आणि टोळक्यांनी, ही जागा आमची आहे, “आम्ही बाळाप्पा वाघीरेचे माणस आहोत ही जागा पाच दिवसात खाली करा अन्यथा आम्हाला काय करायचे ते आम्ही करुन”, अशी धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि.२७) दुपारी अडीचच्या सुमारास हिंजवडीतील अनंतानगरमध्ये घडली.

याप्रकरणी वृध्द प्रल्हाद रामचंद्र बनसोडे (वय ६२, रा. अनंतानगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जयनाथ सुरेश फडतरे, श्रीकांत भानुदास नवले (दोघे रा. पुणे), तसेच अज्ञात तीन तृतीयपंथी, दोन पुरुष आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वृध्द प्रल्हाद बनसोडे हे हिंजवडीतील अनंतानगरमध्ये राहतात. तेथे त्यांचे घर आहे. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास आरोपी जयनाथ फडतरे आणि श्रीकांत नवले हे दोघे अज्ञात तीन तृतीयपंथी, दोन पुरुष आणि एका महिलेला घेऊन बनसोडे यांच्या घरात शिरले. तसेच ही जागा आमची आहे, “आम्ही बाळाप्पा वाघीरेचे माणस आहोत ही जागा पाच दिवसात खाली करा अन्यथा आम्हाला काय करायचे ते आम्ही करुन”, अशी धमकी दिली. यावर घाबरलेल्या वृध्दाने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार तपास करत आहेत.