हिंजवडीत नातेवाईकानेच विवाहितेचे आक्षेपार्ह फोटो काढून केले ब्लॅकमेल

0
1102

हिंजवडी, दि. २८ (पीसीबी) – नात्यातल्या एका व्यक्तीने ३० वर्षीय विवाहितेला हॉटेलमध्ये बोलावून कोल्ड्रींकमध्ये मादक पदार्थ टाकून तिला घरी सोडण्याचा बहाणा करुन अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचे अश्लिल फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी देऊन शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली. ही धक्कादायक घटना आंधारा येथील हॉटेल स्पून जवळ २४ नोव्हेंबर पासून घडत होती.

याप्रकरणी पिडित ३० वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राधेश्याम चंद्रकांत गव्हाणे (रा. नवी मुंबई) या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला ही नोकरी करते. २४ नोव्हेंबर रोजी तिला तिच्या ओळखीचे नातेवाईक चंद्रकांत यांनी कामासाठी आंधारा येथील हॉटेल स्पूनमध्ये बोलावले होते. तेथे त्याने कोल्ड्रींकमध्ये काहीतरी मादक पदार्थ मिसळला होता. ते पिल्यावर या महिलेला चक्कर आल्यासारखे झाले. तेव्हा घरी सोडण्याचा बहाणा करुन गव्हाणे याने तिच्याशी अश्लिल कृत्य करुन विनयभंग केला. यावेळी त्याने त्यांच्या मोबाईलमध्ये महिलेचे काही आक्षेपार्ह फोटो देखील काढून घेतले. त्यानंतर तो हे फोटो पतीस पाठविन अशी धमकी देऊ लागला. तसेच महिलेकडे वारंवार पैशाची आणि शारिरीक सुखाची मागणी करु लागला.  या त्रासाला कंटाळून पिडितेने आखेर हिंजवडी पोलिसात धाव घेतली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.