हार्दिक पटेलला उच्च न्यायालयाचा दणका; लोकसभा लढवता येणार नाही

0
598

अहमदाबाद, दि. २९ (पीसीबी) – मेहसाणा येथे २०१५ मध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी शिक्षेस स्थगिती देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.  त्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले हार्दिक पटेल यांना मोठा धक्का बसला आहे.

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोषी ठरलेल्या गुन्हेगारास निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हार्दिक पटेल यांना मोठा दणका बसल्याचे मानले जात आहे. मेहसाणा जिल्ह्यातील वीसनगरमध्ये २३ जुलै २०१५ रोजी भाजप आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. या हिंसाचाराप्रकरणी वीसनगरच्या सत्र न्यायालयाने हार्दिक पटेलला दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

या निर्णयाविरोधात हार्दिक पटेल यांनी गुजरात उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज( शुक्रवारी) सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.  त्यामुळे हार्दिक पटेल यांना धक्का बसला असून त्यांना लोकसभा लढवता येणार नाही.