हवाई हल्ले झाल्याचे ‘जैश’ चा म्होरक्या मौलाना मसूद अजहरने केले मान्य

0
726

इस्लामाबाद, दि. २७ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाकडून बालाकोटमध्ये हवाई हल्ले झाल्याचे  ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याने मान्य केले आहे. या हल्ल्यात संघटनेचे मोठे नुकसान झालेले नाही. तसेच आपल्या संघटनेच्या सदस्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांनाही कसलाही धक्का बसलेला नाही, असा दावाही मसूद अजहर याने केला आहे.

या हवाई हल्ल्यात मौलाना अम्मार, मौलाना तल्हा सैफ, मुफ्ती अजहर खान काश्मिरी आणि इब्राहिम अजहर यांना लक्ष्य केले होते. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेला या   हल्ल्यांमुळे जोरदार दणका बसला आहे. या संघटनेचे पंचतारांकित प्रशिक्षण तळ उदध्वस्त करण्यात आले आहेत. यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्रीही नष्ट झाली आहे.

मौलाना तल्हा सैफ हा मसूद अजहरचा भाऊ आहे. जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी कारवाईची तयारी करण्याची जबाबदारी सैफकडे होती. त्याचबरोबर मौलाना अम्मार याने आतापर्यंत अनेकवेळा काश्मीर आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणले आहेत.