भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत ऊसतोड दाम्पत्यासह १० वर्षीय नातवाचा मृत्यू

0
654

सोलापूर, दि. २७ (पीसीबी) – भरधाव कारने दोन दुचाक्यांना दिलेल्या जोरदार धडकेत उसतोड कामगार दाम्पत्य आणि त्यांच्या १० वर्षांच्या नातवाचा मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. मृत आणि जखमी हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. हा भीषण अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आलेगाव येथे झाला.

नवनाथ गायकवाड, अलका गायकवाड, सूरज किरण कांबळे अशी मृतांची नावे आहेत. अक्षय गायकवाड आणि गिरज कांबळे हे जखमी आहेत. मृत व जखमी एका कुटुंबातील असून हे सर्व उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील आहेत. जखमींवर इंदापूर येथे उपचार सुरू आहेत. हे सर्वजण आलेगाव येथील भैरवनाथ शुगर कारखान्यातील एका मुकादमच्या ट्रॅक्टरवर ऊस तोडणी मजूर म्हणून काम करत होते. दोन दिवसांपूर्वी कारखाना बंद झाला होता. काही कामानिमित्त ते आलेगाव येथे आले होते. त्यानंतर परत जाताना हा अपघात झाला. पोलीस तपास करत आहेत.