हल्ली राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीतून येते – मुख्यमंत्री

0
955

मुंबई, दि. १० (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट हल्ली बारामतीतून येते. ते भाषणाची सुपारी घेतात, त्यांच्या भाषणाने विचलित होऊ नका,  असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना आज (रविवार) लगावला.

मुंबई येथे भाजपच्या महिला मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.  राज ठाकरे यांनी शनिवारी मनसेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित  मेळाव्यात पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला होता. त्यावर  फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज  उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज ठाकरे हे फक्त कलाकार आहेत. ते १२ वा खेळाडू ही नाहीत आणि नॉन प्लेयिंग कॅप्टनही नाहीत. त्यांना एक खासदार, आमदार, नगरसेवक ही निवडून आणता येत नाही. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे लक्ष देऊ नका, असे ते म्हणाले.