व्यवसायासाठी संधी उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवून चिखलीतील एकाला सव्वा दोन लाखांचा गंडा

0
670

चिखली, दि. १० (पीसीबी) – व्यवसायासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवून अज्ञातांनी एकाला सव्वा दोन लाख रुपयांचा गंडा घातला. तसेच टोमॅटोचा रस आणि अशोका झाडाच्या बिया पाठून फसवणुक केली. ही घटना शुक्रवार (दि.५ जानेवारी) ते मंगळवार (दि.१२ फेब्रुवारी) दरम्यान चिखली येथे घडली.

याप्रकरणी रेवराज देवनाथ तिघरे (वय ४५, रा. त्रिमुर्ती हौसिंग सोसायटी फ्लॅट नं.२०४, स्पाईन रोड चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, [email protected], [email protected] या दोन ई-मेल आयडीवरुन ई-मेल पाठवणाऱ्या अज्ञात ठगांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.५ जानेवारी) ते मंगळवार (दि.१२ फेब्रुवारी) या कालावधीत अज्ञात आरोपींनी फिर्यादी रेवराज यांच्याशी ई-मेल आणि फोन व्दारे संपर्क साधून व्यवसायात गुंतवणुक करण्याची संधी असल्याचे आमिष दाखवून, वेळोवेळी एकूण २ लाख २५ हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात भरण्यास सांगितले. तसेच व्यवसायात संधी उपलब्ध करुन दिली तर नाहीच मात्र त्यांचे पैसे देखील परत केले नाहीत. आणि रेवराज यांना चक्क टोमॅटोचा रस आणि अशोका झाडाच्या बिया पाठून फसवणुक केली. चिखली पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.