काँग्रेसशी यापुढे समसमान पातळीवर चर्चा – प्रकाश आंबेडकर

0
474

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – यापुढील निवडणुकांमध्ये काँग्रेसला आमच्यासोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज (रविवार) ट्विट करून काँग्रेससोबत जाण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे राजकीय गुलाम होऊन राहण्याची वेळ गेली आहे.  आता त्यांना आमच्याशी समसमान पातळीवर येऊन चर्चा करावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आंबेडकर १४४ जागांची मागणी करतील, अशी शक्यता  आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ लाखांहून अधिक मते खेचली आहेत. इम्तियाज जलील यांच्या रूपानं ‘वंचित’चा एक खासदार निवडून आला आहे. तर, या आघाडीला मिळालेल्या मतांमुळे महाराष्ट्रात काँग्रेसला  ९ ते १० जागांवर पराभव झाला आहे. त्यामुळे वंचित आघाडीचा प्रभाव काँग्रेसनेही मान्य केला आहे.