स्मार्ट सिटीची कामे ९० टक्के नव्हे ६४ टक्केच पूर्ण

0
238

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – शहर सल्लागार समितीच्या बैठकीत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे, या संदर्भात दि. ५ मे रोजी वृत्तपत्र व वेबपोर्टलमध्ये बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. त्यासंदर्भात प्रकल्पांच्या कामकाजाबाबत खुलासा करण्यात येत आहे की, केंद्र शासनाचे मार्गदर्शन सुचनांनुसार महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी प्रपोजल मध्ये पॅन सिटी आणि एरिया बेस डेव्हलपमेंट (एबीडी) या दोन घटकांचा समावेश आहे. शहरात विविध विकास प्रकल्प सुरु असून एबीडी या प्रकल्पांतर्गंत ८५ टक्के कामाची प्रगती आहे. तसेच, पॅन सिटी अंतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांची भौतिक प्रगती ६४ टक्क्यांपर्यंत आहे. याबाबत माहिती खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

एबीडी प्रकल्पांतर्गत :-

१. बी. जी. शिर्के – स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव या परिसरात एरिया बेस डेव्हलपमेंट (एबीडी) हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत स्ट्रीट स्केप इक्लुडींग अंडरग्राऊंड युटीलिटी, टु पार्क र्अँड स्मार्ट टॉयलेट हे काम सूरू आहे. या प्रकल्पाची भौतिक प्रगती ८५ टक्के झाली आहे.

पॅन सिटी प्रकल्प –

१ सिटी नेटवर्क – (एल & टी कंपनी) अंतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांच्या कामांची ६८ टक्के प्रगती आहे.

१. या प्रकल्पांमध्ये कोअर लेअर (९६ कोअर) चे ५७ किमी पैकी ५६ किमी अंतराचे म्हणजेच ९९.५ टक्के काम झालेले आहे.

२. अग्रेगेशन लेअर (९६ कोअर) चे १२८ पैकी १२३.५ किमी अंतराचे ९६ टक्के काम पूर्णत्वास आले आहे.

३. असेस लेअर – ३९९किमी पैकी ३५३ किमी अंतरापर्यंतचे ८८ टक्के काम मार्गी लागले आहे.

४. रिस्टॉरेशन – ऑप्टीकरल फायबर केबल रिस्टॉरेशनचे काम ५८५ पैकी ५३७ किमी अंतर पूर्ण झालेले आहे.

५. व्हीएमडी – स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरात नेमून दिलेल्या ६०ठिकाणी व्हीएमडी बसविण्यात आले आहे. जाहिरातीद्वारे आतापर्यंत ३ लाख ५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

६. स्मार्ट किऑक्स – शहरातील ५० महत्वाच्या ठिकाणी ‍स्मार्ट किऑक्स मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. याद्वारे ४० हून अधिक सेवा देण्यात येणार आहे. त्यातील १२ सेवा नॉन पेमेंट तर पेमेंट बेसेस वरील २८ सेवा अंतिम स्थितीत आहेत. कोविड-१९ काळात लसीकरण मोहिम राबविण्यासाठी मोठा उपयोग झाला आहे. ‍

२ ) बेनेट कोलमन (म्युनिसिपल ई- क्लास रुम) – महापालिकेच्या १२३ शाळांच्या १०५ बिल्डींगमध्ये म्युनिसीपल ई-क्लास रुम प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये, कम्युटर लॅब, स्टेम लॅब, रोबोटीक लॅब, एलईडी डीस्प्ले, एचडी कॅमेरा, हेल्प डेस्क, कॅपेसिटी बिल्डींग, डिजीटल कंटेन्ट, एमआयएस डॅशबोर्ड, एक्सपर्ट डीप्लॉयमेंट ही कामे पूर्ण झालेली आहेत. तसेच, बाला प्रकल्पाचे काम सूरू आहे. या प्रकल्पाची ८० टक्के भौतिक प्रगती झालेली आहे.

३)टेक महिंद्रा :- इर्न्व्हामेंटल मॉनीटरींग, स्मार्ट ट्राफीक मॅनेजमेंट, सिटी सर्व्हेलन्स, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट सेव्हरेज, आयसीटी इनॅबल एसडब्लूसी, स्मार्ट सिटी मोबाईल ऍप हे प्रकल्प टेक महिंद्रा कंपनी अंतर्गत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांची ६६ टक्के भौतिक प्रगती झालेली आहे.

४)ऍटोस इंडीया :- जीआयएस बेस इआरपी प्रकल्पाची १९ टक्के भौतिक प्रगती झाली आहे. तसेच, प्रथमदर्शी अ, क, ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गंत येणा-या काही भागात डोर टू डोर सर्व्हे करण्यात आलेला आहे. या प्रकल्पांतर्गत आवश्यक असलेले सॉफटवेअर विकसीत करण्याचे काम चालू आहे.