सोलापुरात पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना मारहाण

0
673

सोलापूर, दि. ९ (पीसीबी) –  सोलापुरातील  पंतप्रधान मोदी यांच्या  दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवणाऱ्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आज (बुधवार) लाथाबुक्या घालत बेदम मारहाण केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ आकाशात काळे फुगेही सोडण्यात आले. तर ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी गणेश डोंगरे, निवृत्ती गव्हाणे, शुभम माने, शिवराज बिराजदार आणि सिद्धराम सगरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांच्या या दडपशाही धोरणाचा काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

या आधी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि काँग्रेसच्या काही नगरसेवकांनाही पोलिसांनी  आज पहाटेच ताब्यात घेतले होते. यावर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर आणीबाणी सदृश स्थिती निर्माण केली आहे, असा आरोप केला होता.