सोमाटणे फाट्यावर आजही दारूसाठी दोनशे फुटाची रांग

0
464

शिरगाव, दि 5 (पीसीबी) – दारूसाठी तळीराम किती लांब रांग लावतील याचा भरवसा नाही, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सोमाटणे. येथे दारुसाठी दुकाणाबाहेर सुमारे दोनशे फूट दोन्ही बाजूला रांग असल्याचे चित्र आज दुसऱ्या दिवशी पहावयास मिळाले.यावरून दारुसाठी तळीराम ऊन, वारा, पाऊस काहीही सहन करतील हे आजच्या लागलेल्या रांगांवरून स्पष्ट होते. 

गेल्या दीड महिन्यापासून स्वतःला रोखून ठेवले होते. शासनाने बंधन काढून टाकल्यावर या तळीरामांना काय करावे आणि काय नको असे झाले. जास्तीत स्टॉक करून ठेवण्यासाठी काही मंडळींनी चक्क खोकीच खरेदी केल्याचे चित्र या भागात पहावयास मिळाले.