सुनील सोनवणे यांनी आयोजित केलेला महिलादिन कार्यक्रम उत्साहात साजरा; महिलांचा उत्फुर्त प्रतिसाद

0
562

चिंचवड,दि.०८(पीसीबी) – महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी प्रभाग क्रमांक २५ येथील ओमकार कॉलनी नंबर २, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील सोनवणे व सौ. जयश्रीताई सोनवणे यांनी आयोजित केलेला महिलादिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

प्रभागातील महिलांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करावे व समाजात आदर्श निर्माण करावा तसेच प्रभागातील महिला वैयक्तिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात या हेतूने श्री. सुनील सोनवणे व सौ. जयश्रीताई सोनवणे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होते. रावेत, वाल्हेकरवाडी परिसरातील महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांचा व सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच सौ. पंचशीला आगळे( अध्यक्ष – आखिल भारतीय सफाई कामगार, उपाध्यक्ष – बांधकाम विभाग चिंचवड विधानसभा), सौ. आरती जाधव(अध्यक्ष – स्वररागिणी महिला प्रतिष्ठान, महिला सक्षमीकरण (शासन मान्य संस्था), सौ.अंजली जाधव(उपाध्यक्ष), सौ. अश्विनी आगळे(अध्यक्ष – अखिल भारतीय सफाई कामगार सेल, चिंचवड विधानसभा) सौ. रोहिणी जाधव(अध्यक्ष – पंचशीला महिला बचत गट, रावेत गाव), सौ. चंद्रकला धाटे( उपाध्यक्ष – पंचशीला महिला बचत गट), श्रीमती सुमन जाधव(सदस्य – पंचशीला महिला बचत गट) , सौ. उज्वला काकडे(सदस्य – पंचशीला महिला बचत गट) आदी मान्यवरांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांना मार्गदर्शन केले.

दरम्यान कार्यक्रमावेळी श्री. सुनील सोनवणे व सौ. जयश्रीताई सोनवणे यांच्यातर्फे महिलांसाठी विविध खेळांचे देखील आयोजन करण्यात आले होते. या सर्व खेळात महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. शिवाय सहभागी झालेल्या सर्व महिलांना या कार्यक्रमावेळी आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात आल्या.