सुधीर मुनगंटीवार कितीही म्हणले चुकी झाली तरी आता माफी नाही

0
390
मुंबई, दि.१३ (पीसीबी) – सुधीर मुनगंटीवार कितीही म्हणले चुकी झाली तरी आता माफी नाही असे सांगत अजित पवार यांनी शिवसेना-भाजपा युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. यावेळी त्यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहत नाही ना असं म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यांच्या एका कानाला मी आणि दुसरीकडे बाळासाहेब थोरात असतात असंही मिश्किल वक्तव्य यावेळी त्यांनी केलं. सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी होय, आम्ही शिवसेनेला फसविले. कधी ना कधी आम्ही ही चूक सुधारू, अशा शब्दात युतीत कोणी कोणाला फसविले याची स्पष्ट कबुली दिली. त्यावर बोलताना अजित पवारांनी आता माफी नाही असा टोला लगावला.