सीमा सावळे व आशा धायगुडे-शेंडगे यांच्या वतीने आहिल्यादेवींना अभिवादन

0
514

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच मोरवाडी येथील आहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास स्थायी समितीच्या माजी सभापती व भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे आणि नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेविका आशा धायगुडे – शेंडगे, अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशा दुरगुडे, अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते.    

 

 सांगवी येथील आहिल्यादेवी अर्धकृती पुतळ्यास महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी  स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेविका माई ढोरे, आशा धायगुडे – शेंडगे, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे, नगरसेवक संतोष कांबळे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्याधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत गोफणे, संदेश शेंडगे, संतोष वाघमोडे, बंजरंग गडगे, अभिमन्यु गाडेकर, सचिन सरत, मनोजकुमार मारकडे, अजय दुधभाते, संतोष मदने, विरुवन माने, नवनाथ भिडे, अनिल टकले, काशिनाथ घोडके, अंबादास पडळकर तसेच सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पडकळकरवाडी येथील बिरुबा गजी मंडळाचे सर्व कलाकार उपस्थित होते.