धक्कादायक: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची परिषद अयशस्वी ठरल्याने किमने घातल्या पाच जणांना गोळ्या

0
468

कोरिया, दि. ३१ (पीसीबी) – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यातील दुसरी परिषद अयशस्वी ठरली. त्याची शिक्षा म्हणून उत्तर कोरियाचे विशेष दूत किम होक चोल यांच्यासह पाच अधिकाऱ्यांना गोळया झाडून मारण्यात आले.

किम जोंग उन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात हानोई येथे झालेल्या परिषदेसाठी किम होक चोल यांनी पूर्वतयारी केली होती. ते किम जोंग उन यांच्यासोबत परिषदेसाठी खासगी ट्रेनमधून गेले होते. सर्वोच्च नेत्याचा विश्वास घात केल्याच्या आरोपाखाली उत्तर कोरियाच्या पथकाने त्यांची गोळया झाडून हत्या केली. किम होक चोल यांच्यासह परराष्ट्र मंत्रालयाच्या चार अधिकाऱ्यांना मार्च महिन्यात मीरीम विमानतळावर गोळया झाडून संपवण्यात आले. अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने वर्तमानपत्राने ही माहिती दिली आहे. अन्य अधिकाऱ्यांची नावे समजलेली नाहीत. आंतर कोरीयन संबंधांचा विषय हाताळणाऱ्या दक्षिण कोरियाच्या एकीकरण मंत्रालयाने या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.