सीमा सावळे यांच्या प्रयत्नातून इंद्रायणीनगर प्रभागात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौद

0
880

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – प्रदूषणमुक्तीच्या संकल्पेनेतून भोसरीतील प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगरमध्ये गणेश विसर्जनासाठी हौद बांधण्यात आला आहे. त्यामध्ये आतापर्यंत अनेक गणेशभक्तांनी विसर्जन केले. तसेच अनेक गणेश भक्तांनी मूर्त्या दान केल्या आहेत. या हौदातच गणरायाचे विसर्जन करून प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी केले आहे.

भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे आणि भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगरमधील जलवायू विहार शेजारील मैदानात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौद बांधण्यात आले आहे.  वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व प्रदषण मुक्तीच्या संकल्पनेतून हा हौद बांधण्यात आला आहे.

त्याला चांगला प्रतिसाद दर्शवत मोशीतील सेक्टर क्रमांक ४, ६, ७, ९, १३ व इंद्रायणीनगरमधील नागरिकांनी आतापर्यंत अनेक गणेश मूर्त्यांचे या हौदामध्ये विसर्जन केले. यावेळी अनेकांनी मुर्त्या दानही केल्या आहेत. प्रदूषणमुक्त गणेश विसर्जनासाठी या कृत्रिम हौदातच गणरायाचे विसर्जन करण्याचे आवाहन भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी केले आहे.