पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना पतीने केली आत्महत्या

1006

इंदूर, दि. १८ (पीसीबी) – पत्नीसोबत लाईव्ह व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास मध्य प्रदेशातील इंदूरमधील एरोड्रम भागात घडली.

रणजीत (वय ३२, रा. लक्ष्मणपूरा कॉलनी, इंदूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादामुळे  रणजीतची पत्नी तिच्या माहेरी बिहारला निघून गेली होती. यामुळे रणजीत खचला होता.  रविवारी रात्री  तो पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना त्याने व्हिडिओ कॉलसुरु असतानाच आत्महत्या केली. पेशाने तो ड्रायव्हर होता. पोलिसांनी हा मोबाइल फोन ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.