सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या घराबाहेर हेरगिरी करणाऱ्या चौघांना अटक  

0
1058

नवी दिल्ली, दि, २५ (पीसीबी) – सक्तीच्या रजेवर  पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या घराबाहेर हेरगिरी करण्याच्या संशयावरून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या चौघांकडे आयबीचे (इंटेलिजन्स ब्युरो) ओळखपत्र मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

हे चौघे आलोक वर्मा यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ते रात्रीपासून वर्मा यांच्या घराबाहेर फेऱ्या मारत असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सरकारने या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्याचबरोबर सीबीआयमधील इतर १३ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आम्हाला नसल्याचे सरकारने म्हटले आहे. केंद्रीय  दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसार एसआयटी याप्रकरणाची चौकशी करेल, असे म्हटले आहे.