सावित्रीबाई फुले विद्यापीठात पुणेरी पगडीवरुन गोंधळ; चार विद्यार्थींना पोलिसांनी घेतले ताब्यात

0
611

पुणे, दि. ११ (पीसीबी) – सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा ११४ व्या पदवी प्रदान कार्यक्रमा दरम्यान आज (शुक्रवार) पुणेरी पगडी घालायची कि फुलेंचा पागोटा घालायचा यावरुन गोंधळ उडाला. या कार्यक्रमात पुणेरी पगडीला विरोध करुन गोंधळ घालणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले. गोंधळामुळे पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्याला प्रथमच गालबोट लागल्याची घटना घडली आहे.

या सोहळ्यात कुलगुरू आणि विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी ‘पुणेरी पगडी’ घातल्यामुळे पदवी प्रदान कार्यक्रमाला सुरुवात होताच काही विद्यार्थ्यांनी निदर्शने करत घोषणाबाजी केली आणि पुणेरी पगडीचा निषेध केला. दरम्यान घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी तातडीने या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. यंदापासून विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभ ब्रिटिशकालीन गणवेशाऐवजी भारतीय पारंपारिक पोशाखात साजरा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार समारंभात आज ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा, पांढऱ्या रंगाचा पायजमा आणि उपरणे असा गणवेश ठेवण्यात आला आहे. मात्र, या गणवेशाला काही विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला होता.