सावधान … बनावट मिनरल वॉटर सर्रास विक्री, लेबल लाऊन पाणी विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल

0
178
Many empty blue and green water bottles. Shallow DOF.

पाण्याच्या बाटल्यांना दुसऱ्या कंपनीच्या लेबल प्रमाणे हुबेहूब लेबल लाऊन पाण्याच्या बाटल्यांची विक्री केली. याप्रकरणी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च 2023 मध्ये महेंद्रा ऑक्सीटॉप कंपनी, वाकी खुर्द चाकण येथे घडला.

कंपनीचे मालक महेंद्र गोरे (रा. वाकीखुर्द, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र गोरे यांची महिंद्रा इंटरप्रायजेस ही कंपनी महेंद्रा ऑक्सीटॉपचे लेबल लाऊन उत्पादित करीत असलेल्या पाण्याच्या बाटल्या विकत आहे. आरोपी यांच्या कंपनीने फिर्यादी यांच्या ऑक्सीरीज कंपनीच्या लेबल सारखे लेबल लावले याबाबत आरोपींनी भारतीय ट्रेडमार्क विभागाची कोणतीही परवानगी न घेता लेबल पाण्याच्या बाटल्यांवर चिकटवून त्याची ग्राहकांना विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत फसवणूक आणि भारतीय ट्रेड मार्क अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.