सावधान…देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

0
295

नवी दिल्ली,  दि. ८ (पीसीबी) : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 45 हजार 892 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 817 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. अ‍ॅक्टिव्ह केसेसही एक हजाराने वाढल्या असून एकूण रुग्णसंख्येच्या त्या 1.5 टक्के इतक्या आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

गेल्या 24 तासात भारतात 45 हजार 892 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 817 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 44 हजार 291 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी –
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 7 लाख 9 हजार 557 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 98 लाख 43 हजार 825 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 5 हजार 28 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 60 हजार 704 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 36 कोटी 48 लाख 47 हजार 549 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी –
देशात 24 तासात नवे रुग्ण – 45,892

देशात 24 तासात डिस्चार्ज – 44,291

देशात 24 तासात मृत्यू – 817

एकूण रूग्ण – 3,07,09,557

एकूण डिस्चार्ज – 2,98,43,825

एकूण मृत्यू – 4,05,028

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,60,704

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 36,48,47,549