सावधान! औषध विक्री एजन्सी असल्याचे भासवून इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने त्याने काय केलं पहा…….

0
641

वाकड दि. 9 (पीसीबी) : औषध विक्री एजन्सी असल्याचे खोटे भासवून एका व्यक्तीने महागडे इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची 80 हजारांची फसवणूक केली. ही घटना 16 मे रोजी थेरगाव येथे घडली. जयसिंग उर्फ जयेश कल्याण डोळे (रा. पिंपरखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याबाबत तेजेश तानाजी अंधारे (वय 28, रा. थेरगाव) यांनी रविवारी (दि. 8) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयसिंग याने त्याचे नाव पांचाळ असल्याचे खोटे सांगितले. तसेच त्याची अतिक प्रायव्हेट लिमिटेड या नावाची औषध विक्री एजन्सी असल्याचे खोटे भासवले. AMPHOTERICIN-B हे इंजेक्शन देतो असे सांगून फिर्यादी अंधारे यांच्याकडून त्यासाठी 80 हजार रुपये गुगल पे द्वारे स्वीकारले. पैसे घेऊन इंजेक्शन न देता तसेच पैसे परत न करता जयसिंग याने अंधारे यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.