सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुंडांवर तडीपारीची कारवाई

0
2630

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, दंगल, दुखापत सरकारी कामात अडथला या सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्ड वरील दोन सराईत गुंडांवर परिमंडळ दोनचे उपायुक्त विनायक ढाकणे यांनी तडीपारीची कारवाई केली आहे.

मनिष गोविंद राठी (वय ३५, रा. फ्लॅट क्र.१५, जगजना अपार्टमेंट, गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव) या गुंडास दोन वर्षांसाठी तर भरत शाम पालमपल्ले (रा. निलेश काटे चाळ, पिंपळे सौदागर) याला एका वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

गुंडांवर वचक बसावा तसेच गुन्हेगारी कारवाया थांबाव्यात म्हणून ही कारवाई करण्यात आली असून सांगवी पोलिस ठाणे हद्दीतील ही दुसरी कारवाई आहे, अशी माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.