सांगवीमध्ये गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसासह एकाला अटक

0
762

सांगवी. दि. २१ (पीसीबी) – एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूसासह सांगवी पोलिसांनी  तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई सांगवीतील ममतानगर येथील बालयोगी आश्रमाजवळ करण्यात आली.

उमेश सुरेश पवार (वय २९, रा. निगडे गिरणी शेजारी, डायमंड चौक, यशवंतनगर, येरवडा) असे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममतानगर येथील बालयोगी आश्रमाजवळ एक तरुण संशयितरित्या उभा असून त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती सांगवी पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिसांनी त्यानुसार सापळा रचून उमेश पवार याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन त्याला अटक केली.  सांगवी पोलिस अधिक तपास करत आहेत.