सांगवीत रिक्षा पुढे घेण्यास सांगितल्याच्या रागातून रिक्षाचालकाने वृध्दाचा हात मोडला

0
525

सांगवी, दि. २८ (पीसीबी) – गेटसमोर लावलेली रिक्षा पुढे घेण्यास सांगितल्याच्या रागातून एका रिक्षा चालकाने ६३ वर्षीय वृध्दाला बांबुने मारहाण करुन त्यांचा डावा हात मोडला. ही घटना शुक्रवार (दि.२६) पावणेसातच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉनसमोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली.

याप्रकरणी धनंजय बबन सोनवणे (वय ६३, रा. कृष्णाई कॉलनी, विमल गार्डन समोर, रहाटणी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रिक्षा (क्र. एमएच/१२/एमडब्यु/०३६२) वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पावणेसातच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉनच्या गेट समोरच रिक्षा (क्र. एमएच/१२/एमडब्यु/०३६२) वरील अज्ञात चालकाने रिक्षा लावला होता. यावर वृध्द धनंजय यांनी त्याला ती रिक्षा पुढे घेण्यास सांगितले. यावरुन त्या दोघांमध्ये वाद झाला आणि रिक्षाचालकाने बांबूने धनंजय यांना मारहाण केली. यामध्ये धनंजय यांचा डावा हात मोडला आहे. सांगवी पोलीस आरोपी रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.