सांगवीत पार्कींगच्या वादातून एकाला सिमेंटच्या गट्टूने जबर मारहाण

0
416

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – बिल्डींगसमोर गाडी पार्क केल्याच्या रागातून एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना मंगळवार (दि.७) रात्री साडेबाराच्या सुमारास नवी सांगवी येथील पीडब्लु डी कॉलनी, बिल्डींग क्र. सी ५ येथे घडली.

योगेश गायकवाड असे जखमी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, योगेश हरिश्चंद्र भालेराव (वय २२, रा. बिल्डींग क्र. सी ५, पीडब्लु डी कॉलनी, नवी सांगवी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी योगेश गायकवाड यांनी त्यांची गाडी ही ते राहत असलेल्या पीडब्लु डी कॉलनी, बिल्डींग क्र. सी ५ येथे पार्क केली होती. यावेळी रात्री साडेबाराच्या सुमारास आरोपी योगेश भालेराव याने त्यांना ती गाडी काढण्यास सांगीतली. यावर दोघांमध्ये वाद सुरु झाला आणि योगेश भालेराव याने सिमेंटचा गट्टू योगेश गायकवाड यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी योगेश भालेराव याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक शेंडकर तपास करत आहेत.