माझ्या कानाखाली मारली, तर तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल; मोदींचा ममता बॅनर्जींना टोला

0
491

पुरुलिया, दि. ९ (पीसीबी) –  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माझ्या कानाखाली मारली, तर तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल, दीदींचा मी आदर करतो, पण तेही मी सहन करेल, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.  

मोदी यांनी आज (गुरूवार) पुरुलिया येथील  प्रचारसभेत  ममता बॅनर्जी यांच्यावर  जोरदार हल्लाबोल केला.  ममता बॅनर्जी यांनी मोदीच्या कानाखाली मारायची आहे, असे म्हटले होते. हाच धागा पकडून मोदींनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

मोदी म्हणाले की, मला सांगितले होते की, दीदींना मोदींच्या कानाखाली मारायची आहे. ममता दीदी,  मी तर तुम्हाला दीदी म्हणतो. तुमचा आदर करतो. तुम्ही  कानाखाली  मारली,  तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल. तेही सहन करीन, असा खोचक टोला मोदी यांनी  ममता यांना लगावला.