सांगवीत दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटून साडेचौदा लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

0
584

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – बंद बंगल्याच्या दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातील रोख चार लाख रुपये, अमेरिकन डॉलर, घड्याळे, सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, एटीएम कार्ड असा एकूण १४ लाख ४० हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना रविवारी (दि.७) दुपारी २ ते सोमवारी (दि.८) दुपारी आठच्या दरम्यान बंगला नंबर.२२, रक्षक सोसायटी औंध येथे घडली.

याप्रकरणी ललीता दिपक बागवे (वय ६२, रा. बंगला नं.२२ रक्षक सोसायटी, औंध कॅम्प, रक्षक चौकजवळ, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ललीता बागवे या बंगला नं.२२ रक्षक सोसायटी, औंध कॅम्प येथे राहतात. रविवारी (दि.७) दुपारी २ ते सोमवारी (दि.८) दुपारी आठच्या दरम्यान त्याचा बंगला बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटून बंगल्यात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले रोख चार लाख रुपये, अमेरिकन डॉलर, घड्याळे, सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, एटीएम कार्ड असा एकूण १४ लाख ४० हजारांचा ऐवज चोरुन नेला. ललीता या सोमवारी सकाळी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.