सांगवीत कोयत्याचा धाक दाखवून दाबेली विक्रेत्याला लुटले

0
709

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – तीन जणांच्या टोळक्यांनी कोयत्याचा धाक दाखवून एका दाबेली विक्रेत्याला लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि. २७) रात्री साडेदहाच्या सुमारास जुनी सांगवी येथील सद्गुरू स्नॅक्स सेंटरवर घडली.

याप्रकरणी किरण नंदकुमार शेवाळे (वय ३३, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जोग्या उर्फ अक्षय हेमंत जाधव (रा. जुनी सांगवी) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण याचे जुनी सांगवी येथील ढोरे चौक येथे कच्ची दाबेलीचे सदगुरु नावाचे स्नॅक्‍स सेंटर आहे. तेथे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी किरण आणि त्याचे दोन साथीदार  आले.  या तिघांना काहीही कारण नसताना किरण यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली आणि ‘दाबेली दे’ म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर किरण याच्या खिशातील ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच स्नॅक्‍स सेंटच्या काऊंटरवर कोयता मारून काऊंटरची काच फोडून ‘बघून घेईन’ अशी धमकी दिली आणि पसार झाले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.