सांगलीत भाजपाचे तोंड पोळले, पुण्यात ‘ताकही फुकून पिण्याची’ अशी आली वेळ…

0
279

पुणे, दि. ४ (पीसीबी) : महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीच्या निवडणुकीसाठी भाजप नगसेवकांना व्हिप जारी करण्यात आला आहे. सांगलवी महापालिकेत बसलेल्या झटक्यानंतर भाजपने हा निर्णय घेतलाय. भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याच्या चर्चांवरुन भाजपने स्थायी आणि शिक्षण समितीच्या निवडणुकीपूर्वी सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

पुणे महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीची निवडणूक शुक्रवारी पार पडणार आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून हेमंत रासने यांनी, तर शिक्षण समिती अध्यक्षपतासाठी भाजपकडून मंजुश्री खर्डेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्षपदासाठी कालिंदा पुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी बंडू गायकवाड आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी सुमन पठारे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर शिक्षण समितीच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांनी अर्ज दाखल केला आहे. स्थायी समितीमधील पक्षीय बलाबल पाहता भाजपाला धोका नाही, पण कोणतिही जोखीम नको म्हणून सदस्यांसाठी व्हिप जारी कऱण्यात आला आहे. सांगली महापालिकेत दुधाने तोंड भाजले म्हणून पुणे महापालिकेत आता ताकही फुंकून पिण्याची वेळ भाजपावर आली आहे.

स्थायी समिती पक्षीय बलाबल :–
भाजप – १०
राष्ट्रवादी – ४
काँग्रेस – १
सेना – १
महापालिकेतील पक्षीय बलाबल –
भाजप – ९९
राष्ट्रवादी – ४२
काँग्रेस – १०
सेना – १०
एमआयएम – १
मनसे – २