सवर्णांचे १० टक्के आरक्षण  न्यायालयात टिकण्याबाबत शंका – शरद पवार  

0
303

कोल्हापूर, दि. १३ (पीसीबी) – सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय संसदेत बहुमताने घेण्यात आला आहे. मात्र, तरी तो न्यायालयीन पातळीवर टिकणार नाही. कारण घटनेनुसार आरक्षणाची मर्यादा ५० टक्के आहे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त आदींच्या आरक्षणाला कोणताच धक्का लागणार नाही. पण सवर्ण आरक्षण घटनात्मकरित्या टिकेल, असे मला वाटत नाही, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केले .